Pages

पेज

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

पंतप्रधान पूर्णवेळ कार्यरत; पीएमओची माहिती - पीटीआय

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एकही सुटी घेतली नसून ते पूर्णवेळ कार्यरत असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिली आहे. 

पंतप्रधानांच्या रजेविषयी माहिती अधिकाराअंतर्गत दाखल अर्जास उत्तर देताना पीएमओने सदरची माहिती दिली. अर्जदाराने माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, अटल बिहारी वाजपेयी, एच. डी. देवेगौडा यांसह इतर जणांनी घेतलेल्या रजेच्या तपशिलाचीही मागणी केली आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही नोंद हे कार्यालय ठेवत नसल्याचे पीएमओने स्पष्ट केले आहे.

पीएमओकडे मागे अशा प्रकारचे अनेक अर्ज आले असून, त्याद्वारे विविध प्रकारची माहिती मागविण्यात आली होती. पंतप्रधानांनी संविधान वाचले आहे का, त्यांचा खासगी मोबाईल क्रमांक कोणता, याबरोबरच त्यांनी कधी रामलीलेमध्ये सहभाग घेतला आहे का, अशा प्रश्नांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा