मुंबई : रेल्वे प्रवासाचे ऑनलाइन बुकिंग करण्यासंदर्भातील नियमांमध्ये रेल्वे खात्याने (आयआरसीटीसी) बदल केले आहेत. ऑनलाईन तिकिट बुक करताना, http://irctc.co.in या संकेतस्थळावरून एका व्यक्तीचे लॉग-इन वापरून एका दिवसात दोनवेळा व एका महिन्यात फक्त सहावेळाच तिकिटे बुक करता येणार आहेत.
रेल्वेकडून 15 फेब्रुवारीपासून नवा नियम लागू करण्यात येणार आहे. एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याने काही प्रवाशांना अडचणी येतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा बदल केला असला तरी या बदलाचा सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
तत्काळ बुकिंगमध्ये एका व्यक्तीला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत फक्त दोन तिकीटे घेता येतील.
आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर होणाऱ्या आगाऊ तिकीटं आरक्षणासाठी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत एका लॉग-इनवरुन केवळ दोन ऑनलाईन तिकिटे बुक करता येतील.
Pages
▼
पेज
▼
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा