Pages

पेज

बुधवार, ६ जानेवारी, २०१६

पठाणकोट जवळील गुरुदासपूर येथे "हाय अलर्ट'

गुरुदासपूर - पंजाब राज्यामधील गुरुदासपूर जिल्ह्यामध्ये लष्कराच्या गणवेशामधील दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर अत्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लष्कराकडून या भागामध्ये मोठी शोधमोहिम राबविण्यात येत आहे. लष्करी छावणीचा भाग असलेल्या टिब्रीमध्ये लष्करी गणवेशामधील दोन व्यक्तींकडून संशयास्पद वर्तन आढळून आले. पोलिसांनी तत्काळ याची माहिती लष्करास कळविल्यानंतर या भागामध्ये संयुक्त शोधमोहिम सुरु करण्यात आली.
गुरुदासपूर येथे गेल्या वर्षामधील (2015) जुलै महिन्यात दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला चढविण्यात आला होता. पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुदासपूर भागामध्येही अत्यंत सावधानता बाळगण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा