Pages

पेज

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून पठाणकोट येथे सीमेपलिकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली

नवी दिल्ली, 4-1-2016

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

पठाणकोट येथे सीमेपलिकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याची त्यांनी कठोर शब्दात निंदा केली आणि या हल्ल्यात झालेल्या जिवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

राष्ट्राध्यक्ष घनी यांनी मजार-ए-शरीफ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली.

भारतात झालेल्या भूकंपातील जिवित आणि वित्त हानीच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान भारतासोबत असल्याची भावना घनी यांनी व्यक्त केली.
 

सीमेपलिकडून होणारे दहशतवादी हल्ले आणि भूकंप याबाबत अफगाणिस्तान देत असलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष घनी यांचे आभार मानले.

मजार-ए-शरीफ येथील दहशतवादी हल्ला उधळून लावण्यासाठी आणि भारतीय दूतावास आणि त्यातील कर्मचाऱ्‍यांची सुरक्षा कायम राखण्यासाठी अफगाण राष्ट्रीय सुरक्षा दलांनी दाखवलेल्या शौर्य आणि धैर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या जनतेबरोबर उभा राहील, अशी भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
 

[PIB]
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा