Pages

पेज

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

अफगणिस्तानात दूतावासाच्या इमारतीजवळ स्फोट

काबूल (अफगणिस्तान)- भारत, पाकिस्तान व इराणचे दूतावास असलेल्या इमारतीजवळ आज (मंगळवार) सकाळी स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रातांच्या राज्यपालांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलालाबादमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाच्या इमारतीपासून 400 मिटर अंतरावर स्फोट झाला. परिसर सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. या हल्ल्याबाबत अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
दरम्यान, उत्तर अफगणिस्तानातील मझर-ए-शरीफ या शहरातील भारतीय दुतावासाजवळ रविवारी दहशतवादी हल्ला झाला होता.

 

[वृत्तसंस्था ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा