Pages

पेज

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

माजी सैनिकांचे ‘पदकवापसी’ आंदोलन दिशाभूल करणारे- पर्रिकर

‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ आंदोलनात सहभागी असणाऱ्या माजी सैनिकांकडून छेडण्यात आलेले पदकवापसी आंदोलन दिशाभूल

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली | November 10, 2015 4:08 PM    

गेली ५० वर्षे ज्या मागण्यांचा साधा विचारही झाला नव्हता, त्या कमी-अधिक प्रमाणात पूर्णही झाल्याचे असे पर्रिकरांनी यावेळी सांगितले.

‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ आंदोलनात सहभागी असणाऱ्या माजी सैनिकांकडून छेडण्यात आलेले पदकवापसी आंदोलन दिशाभूल करणारे असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी सांगितले. आंदोलन करणे हा त्यांचा लोकशाहीतील हक्क आहे. मात्र, ते या माध्यमातून दिशाभूल करत असल्याचे पर्रिकरांनी म्हटले. ‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ योजनेची अधिसूचना काढणे, हे माझे मुख्य काम होते, ते मी केले आहे. त्याबाबत असमाधानी असल्यास आंदोलकर्त्यांनी आयोगाशी चर्चा करावी. गेली ५० वर्षे ज्या मागण्यांचा साधा विचारही झाला नव्हता, त्या कमी-अधिक प्रमाणात पूर्णही झाल्याचे असे पर्रिकरांनी यावेळी सांगितले.
‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ योजनेच्या औपचारिक अधिसूचनेबाबत आंदोलनकर्त्यां माजी सैनिकांनी असमाधान व्यक्त केल्याच्या संदर्भात ‘सर्वच मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत’, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करताना मंगळवारपासून आपली पदके परत करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता.
 
माजी सैनिकांची आजपासून ‘पदकवापसी’ 


[ Loksatta ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा