Pages

पेज

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

मोदी सुधारा, नाहीतर अवस्था वाईट होईल - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

                            
                               
मुंबई- ‘अजूनही वेळ आहे, सुधारा... नाहीतर पुढे आणखी वाईट अवस्था होईल‘ असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

बिहार निवडणुकांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) लालू-नितीश-राहुल यांच्या महाआघाडीने धडा शिकविल्याने विरोधी पक्ष आनंद साजरा करीत आहेत. त्याचवेळी अण्णा हजारेंनी मोदींना वरील सल्ला दिला आहे.



बिहार निवडणुकांमध्ये महाआघाडीला मिळालेले घवघवीत यश आणि एकूण निकाल याबद्दल बोलताना अण्णा हजारे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजूनही सुधारण्यासाठी वेळ आहे. ते सुधारले नाहीत तर यापेक्षाही वाईट अवस्था होईल.

आधी करा, मग सांगा
लोकसभा निवडणुकांपूर्वी जनतेला मोठी आश्वासने दिली, परंतु ती पूर्ण केली नाहीत त्यामुळे लोकांचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला. जर आश्वासने पूर्ण करायची नव्हती तर ती आश्वासने दिलीच का, असा सवाल विचारत ‘आधी काम करा आणि मग आश्वासन द्या‘ असे अण्णा हजारे यांनी सांगतिले.

‘ते‘ जाणतात विकास कसा करावा
निवडणुकीतील विजयाबद्दल नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे अण्णा हजारे यांनी अभिनंदन केले. विकास करावा हे नितीश कुमार यांना माहीत आहे. नितीश यांनी पाणी व्यवस्थापनावर काम करायला हवे. त्यामुळे बिहारी लोकांना तिथेच रोजगार मिळेल, बाहेर जावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.


[ वृत्तसंस्था ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा