Pages

पेज

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०१५

ठळक घडामोडी

शेअरबाजार तेजीत, सेन्सेक्स १४७.३३ अंकांनी वधारला असुन २६,९३२.८८ वर बंद
 
बंगळुरूतील इंडो-जर्मन उद्योग परिषद, भारत हा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीच्या उंबरठ्यावर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंग चाचणीवर ९ ऑक्टोबरला निर्णय, समीरला कोर्टात हजर रहावे लागणार
 
आधार कार्डच्या वैधतेवर सुप्रीम कोर्ट उद्या बुधवारी सुनावणार निर्णय
 
मुंबई मेट्रो- २ आणि मेट्रो-५ च्या प्रकल्पाला मंजूरी, ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रल्पाचे भूमिपूजन
 
फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जपानच्या ताकाक काजिता आणि कॅनडाच्या आर्थऱ बी मॅकडोनाल्ड यांना जाहीर
 
अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्नसह अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात टी-२० मॅच खेळणार
 
नाशिक - येवल्यातील नाशिक जिल्हा बँकेवर दरोडा, १७ लाख ९० हजारांची रोकड लंपास
 
नाशिक - पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीची मागणी
 
नाशिक - त्र्यंबकेश्वरमधील पिंप्री येथील आश्रम शाळेतील ९ वीच्या विद्यार्थ्याचा (अरुण प्रकाश महाले) तलावात बूडन मृत्यू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा