Pages

पेज

रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

ठळक घडामोडी


 
1.       गेले दहा दिवस भाविकांसोबत असलेल्या गणरायाने भाविकांना सकारात्मक ऊर्जा आणि आनंद दिला. आज गणरायाला निरोप देताना प्रत्येक भाविक हळवा. आपल्या इष्ट कामासाठी, संकटांचे हरण करण्यासाठी पुन्हा या, असे आवाहन गणरायाला.
 
2.       केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) व ईडीने कोलकाता व सिलिगुडी येथे गेले दोन दिवस टाकलेल्या धाडींमध्ये हवाल्याची ८० कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, हवाला दलालांमार्फत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हा पैसा पुरविण्यात येत होता, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
 
3.       हज यात्रेतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीय यात्रेकरूंची संख्या वाढून शनिवारी १८ झाली, तर या दुर्घटनेत आतापर्यंत ७१९ जणांचा बळी गेला आहे.
 
4.       दबंग’स्टार सलमान खानच्या एका नातेवाईकाकडून डॉक्टर तरुणीची छेडछाड होत असल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुला मिर्झा खान असे त्याचे नाव असून लग्नासाठी गेल्या दीड वर्षापासून मानसिक त्रास देत असल्याचे तक्रार या तरुणीने केली आहे.
 
5.       पुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या साक्षीने हा ऐतिहासिक निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला.
 
6.       सलग तिसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी खरेदीचे सत्र चालविल्याने सोन्याने महिनाभरात प्रथमच २७ हजाराचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी बाजारात सोने ४०० रुपयांनी वधारून २७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.
 
7.       ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनानत संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याच्या पोलिस कोठडीत कोर्टाने सोमवारपर्यंत (ता.२८) वाढ केली आहे.
 
8.       वाहन नोंदणीसाठी आता हेल्मेट सक्तीचे होणार आहे.तुम्ही नवीन वाहन घेणार असाल तर वाहनाच्या अॅसेसरीजबरोबरच तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे हेल्मेटही खरेदी करावे लागणार आहे.
 
9.       जळगाव : ‘टॅब’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीला मेहरूण येथील मणियार प्राथमिक विद्यालयात शनिवारपासून प्रारंभ झाला. पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी बालकाचा टॅबद्वारे छायाचित्र काढून या योजनेला सुरुवात झाली.
 
10.   पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील (डीपी) आरक्षणांवरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३९० आरक्षणे वगळण्याची शिफारस विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केली आहे.
 

More details


आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा