Pages

पेज

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

भाजपवर टीका करणे हा कॉंग्रेसचा छंद - नायडू

नवी दिल्ली - कॉंग्रेसने दहा वर्षे सत्ता असूनही "वन रॅंक वन पेन्शन‘ योजना लागू केली नसून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर प्रत्येकवेळी टीका करणे हा कॉंग्रेसचा छंद असल्याची टीका केंद्रीयमंत्री वेंकय्या नायडू यांनी केली आहे.

ते म्हणाले की, "ओआरओपीच्या मुद्याचे भाजपने कधीही राजकारण केले नाही. प्रत्येकवेळी भाजपवर टीका करणे हा कॉंग्रेसचा छंद बनला आहे‘ तसेच "जनतेच्या मागण्या पूर्ण न करणारे कॉंग्रेस दोषी आहे. त्यांनी केवळ घोषणाच केल्या‘ असेही नायडू पुढे म्हणाले. भारतीय लष्करातील माजी सैनिकांसाठीच्या "वन रॅंक वन पेन्शन‘ योजनेच्या अंमलबजावणीची केंद्र सरकारने आज (शनिवार) अधिकृत घोषणा केली. यावर कॉंग्रेस भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्‍वभूमीवर नायडू यांनी कॉंग्रेसला प्रत्युत्तर दिले.
 
[वृत्तसंस्था]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा