Pages

पेज

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

ठळक घडामोडी


 
पुणे: 'डीजे' बंदीच्या विरोधात महाराष्ट्र चित्ररथ-वाद्यवृंद श्रमिक महासंघाचा आंदोलनाचा इशारा .

पालकमंत्री गिरीश बापट यांचं वक्तव्य म्हणजे सांस्कृतिक शोकांतिका... मास्तर म्हणून कान पकडणाऱ्या बापटांचे कान कोण पकडणार... नीलम गोऱ्हे यांची टीका...

नाशिक: जोरदार पावसामुळे नदीची पातळी वाढली असून गोदापात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनातर्फे भाविकांना करण्यात आली आहे. 

गणपती मूर्तीकारांना पोलिसांनी दिलेली नोटीस मागे, रात्री ९ नंतरच मूर्ती बाहेर काढण्याविषयी दिली होती नोटीस. 

पुणे, नाशिक, धुळे, जळगावाता पावसाची हजेरी. 

पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या, पिंपरीतील गांधीनगर भागातील घटना. कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा अंदाज. 

नाशिकमधील महा पर्वणीवर पावसाचे सावट, जोरदार पावसाला सुरूवात. प्रशासन चिंतेत. 

सत्ताधारी व विरोधकांनी शेतक-यांसाठी एकत्र यावं, त्यांना सावरण्यासाठी कोणीच नाहीये - मकरंद अनासपुरे.

शेतक-यांना मदत ही मलमपट्टी आहे, मात्र त्यांना कायमचं उभं करायचं आहे. मदतीसाठी आलेल्या शेतक-यांना परत पाठवलं नाही, रकमेत तडजोड करून त्यांना मदत दिली. - मकरंद अनासपुरे.

उद्या नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य पर्वणी स्नान असून त्यानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी ८ ते १० तास लागणार असून कलश दर्शन करण्याबाबत पोलिसांकडून भाविकांना लाऊड स्पीकरवरून आवाहन करण्यात येत आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 

पुण्यात कायदयाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे वृत्त. 

एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा, टीका करण्याऐवजी शेतक-यांना मदत करून, त्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे. 

बिहारप्रमाणे राज्यातील शेतक-यांना केंद्राने मदत करावी- उद्धव ठाकरे 

दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी शिवसेना करणार कन्यादान, पीडित शेतक-यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राबवणार कन्यादान योजना - उद्धव ठाकरे

ज्युनिअर वुमन्स हॉकीएशषिया कप:  सेमीफायनलमध्ये जपानकडून भारत पराभूत, पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानने भारताला ३-२ असे हरवले
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा