Pages

पेज

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

शहीद जवान योगेश भदाणे यांना मानवंदना

शनिवारी (ता. 13) जम्मू-काश्‍मीर येथे पाकिस्तान सैन्याने केलेल्या गोळीबारीमध्ये बांदीपुरा येथे सीमेचे रक्षण करत असताना योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आले. आज (ता. 15) दुपारी 4 वाजता शहीद योगेश भदाणे यांचे पार्थिक भारतीय वायुसेनेच्या खास विमानाने (केए 2764) ओझर विमानतळ येथे दाखल झाले.

या वेळी एअर ऑफिसर कमांडर समीर बोराडे (11 बेस रिपेअर डेपो), ग्रुप कॅप्टन जे. मॅथ्यू, विंग कमांडर सुरेंद्रर दुबे, आर्टिलरीचे मेजर मोहित खत्री, जिल्हधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, आमदार अनिल कदम, जिल्हा सैनिककल्याण अधिकारी ज्ञानदेव गुंजाळ, किसन सातपुते, आदींनी शहीद योगेश भदाणे यांना मानवंदना वाहिली. भारतीय वायुसेना आणि स्थलसेनेचे जवान उपस्थित होते.
साडेचार वाजेच्या सुमारास खास हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिक मूळ गाव खलाणे (जि. धुळे) या ठिकाणी नेण्यात आले.

या वेळी शहीद जवान योगेश भदाणे यांच्या पत्नी पूनम भदाणे देखील त्यांच्या पार्थिवाबरोबर होत्या. 2008 मध्ये योगेश हे भारतीय सैन्यात दाखल झाले होते. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

चीन-पाकिस्तान सीमेवर आयटीबीपीचा आकाशातून पहारा

नवी दिल्ली - डोकलाम विवादापासून धडा घेऊन आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) सीमाभागात लवकरच एक हवाई दल स्थापन करणार आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर्स खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आयटीबीपीच्या हवाई दलामुळे सीमाभागात पीएलएच्या सैन्याच्या होणाऱ्या कारवाया आणि आक्‍रमण यावर वेळेवर नियंत्रण आणता येणार आहे. 3,488किमी लांबीच्या भारत-चीन सीमेच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हिमालयातील 16 हजार ते 18 हजार फूट उंचावरील सीमाभागाची सुरक्षा आयटीबीपी करू शकणार आहे. आयटीबीपीच्या हवाई दलाचे तळ चडीगड आणि9 बोरझार (गुवाहाती) येथे असतील आणि जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चीन आणि सिक्किमसह उत्तरपूर्व भागात आयटीबीपीचा पहारा असेल असे आयटीबीपीचे महासंचालक आर के पचनंदा यांनी सांगितले आहे.

खरेदी करण्यात येणारी ट्विन इंजीन हेलिकॉप्टर्स बहुउपयोगी असणार आहेत. त्याच्यात अधिक उंचीवरून उडण्याची क्षमता असून एकाच वेळी 8 ते 10 जवानांना घेऊन जाऊ शकतील. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा वाहून नेण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी उड्डाण करू शकत असल्याने रेशन पुरवण्यासाठीही ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त आहेत.

भारत-चीन संघर्षानंतर 24 ऑक्‍टोबर 1962 रोजी आयटीबीपीची निर्मिती करण्यात आली होती. 4 बटालियन्सनी सुरुवात झालेल्या आयटीबीपीमध्य आता 45 सेवा बटालियन्स आणि 4 विशेष बटालियन्स आहेत.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा विद्यापीठात सत्कार

 

पुणे - प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा 75व्या वाढदिवसानिमित्त (अमृत महोत्सव) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विविध राष्ट्रीय संस्थांच्या वतीने मंगळवारी ( दि. 16) सत्कार करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील ज्ञानेश्वर सभागृहात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
डॉ. माशेलकर यांचे "पीएचडी'चे मार्गदर्शक प्रो. एम. एम. शर्मा हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे अध्यक्षस्थानी असतील.
याबरोबरच इंटरयुनिव्हर्सिटी काऊन्सिल फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्‍स (आयुका), नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस (एनसीसीएस), सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग (सी-डॅक), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (आयआयटीएम), आघारकर रीसर्च इन्स्टिट्यूट (एआरआय), सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्‍ट्रॉनिक्‍स टेक्‍नॉलॉजी (सी-मेट), भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) या संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

साश्रु नयनांनी शहीद योगेश भदाणे यांना अखेरचा निरोप

धुळे - पाक सैन्याकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या लान्स नायक योगेश भदाणे या जवानावर सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. देश भक्तीपर गीते, 'शहीद योगेश भदाणे अमर रहे' यांसह भारत मातेचा जयघोष यामुळे वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. शहीद योगेश यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यावेळी पंचक्रोषीतील ग्रामस्थांनी योगेशला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिलाशहीद जवान योगेशच्या पार्थिवाच्या स्वागतासाठी गावातील महिला तरुणींनी अंगणात आणि अंत्यसंस्काराच्या मार्गावर रांगोळ्या काढून आणि फुलांचा गालीचा अंथरुन रस्ता तयार करुन संपूर्ण गाव सजविले होते. तसेच चौका-चौकात योगेश यांचे श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. देशभक्तीपर गीते वाजवून गावातील वातावरण उत्साहपूर्ण बनले होते.
योगेशचे पार्थिव सायंकाळी खलाणे गावात हेलिकॉप्टरने पोहोचले आणि अख्या गावातील राहिवाशांसह ग्रामस्थांच्या भावनांचा बांध फुटला. योगेश भदाणे हा जवान पाक सैन्याच्या गोळीबारात शहीद झाल्याची वार्ता शनिवारी गावात पोहोचल्यानंतर गेल्या २ दिवसांपासून शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावावर शोककळा पसरली होती. सोमवारी सकाळी जम्मू भागात धुके असल्याने लष्कराचे विमान निघायला विलंब झाला. सकाळी येणारे पार्थिव हे दुपारी उशीरा जम्मू येथून थेट नाशिकजवळील ओझर येथे आले. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते खलाणे गावात आणण्यात आले. यावेळी राज्याचे रोहयो आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते.

स्पष्टवक्‍ते लष्करप्रमुख (अग्रलेख)

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी परवाच पाकिस्तानविषयी केलेल्या आव्हानात्मक वक्‍तव्यामुळे सध्या पाकिस्तान चांगलाच भडकला असल्याचे चित्र आहे. "पाकिस्तानची तथाकथित आण्विक क्षमता आम्ही युद्धात उघडी पाडू,' असे रावत यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्‍तव्याला प्रत्युत्तर देताना, "भारताला अणुयुद्धाची खुमखमी असल्याचे भारतीय लष्कर प्रमुखांच्या वक्‍तव्यातून दिसून येत असून, त्यासाठी आमचीही तयारी आहे,' असे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी तर त्याच्याही पुढची पायरी गाठत, "भारताची अणुहल्ल्याची इच्छा असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो,' असे म्हटले आहे. भारतीय लष्करप्रमुखांच्या वक्‍तव्याचा डिप्लोमॅटिक चॅनेलच्या माध्यमातून पाकिस्तानने भारत सरकारकडे अधिकृतपणे निषेध नोंदवला आहे.

राजकीय पक्षांनीही त्याविषयी संयम बाळगून लष्करप्रमुख जनरल रावत यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. ज्या बाबींचा मैदानावर जाऊन मुकाबला करण्याची जबाबदारी शेवटी लष्करावर येते, त्या बाबतीत त्यांचे धोरण त्यांनाच ठरवू देणे ही आता काळाची गरज आहे.

रावत यांनी पाकिस्तानविषयी केलेली काही वक्‍तव्ये किती आवश्‍यक होती, यावर वेगळ्या दृष्टिकोनातून कोणी आक्षेप घेईलही, पण पाकिस्तानला लष्करी सामर्थ्याविषयी काही बाबी स्पष्टपणे सुनावणे गरजेचेच होते. ते काम रावत यांनी केले आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. भारतीय लष्कर आता पकिस्तानच्या बाबतीत अधिक सक्रिय झाले असल्याचेच हे द्योतक मानले पाहिजे. लष्करप्रमुखांनी मूग गिळूनच गप्प बसले पाहिजे, म्हणजे तो राजनैतिक सूज्ञपणा समजला जातो, असे मानण्याची एक पद्धत आहे. पण सध्याचे लष्करप्रमुख जरा अधिक बोलके आणि स्पष्टवक्‍ते आहेत. शेजारील देशांबाबतची वक्‍तव्ये राजकीय नेतृत्वानेच केली पाहिजेत, असा आपल्या सरकारी कार्यपद्धतीतील एक दंडक मानला जातो. त्यामुळे शेजारील देशांविषयी या आधीच्या साऱ्याच लष्करप्रमुखांनी कायमच सावधगिरीची भूमिका घेत, जेवढ्यास तेवढीच विधाने आतापर्यंत केली होती. पण म्हणून रावत यांनी पाकिस्तानविषयी स्पष्टवक्‍तेपणाने केलेली विधाने म्हणजे मर्यादा उल्लंघन म्हणता येणार नाही. पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, असे त्यांच्याकडूनच सातत्याने बोलले जाते.

युद्धाची जर वेळ आलीच तर त्यांची तथाकथित आण्विक क्षमता आम्ही उघडी पाडू, असे रावत म्हणाले आहेत. यात वावगे काही नाही. आण्विक शक्‍तीचे पाकिस्तानकडून जेवढे भांडवल केले जाते तितकी त्यांच्यात क्षमता नाही एवढेच रावत यांनी जरा स्पष्टपणे सुनावले इतकेच. पण जनरल रावत यांच्या या स्पष्टपणे चार गोष्टी सुनावण्याच्या घटनेने भारतीय लष्कराला आता बऱ्यापैकी मोकळीक मिळाली आहे असे मानायला हरकत नाही. सध्या भारत-पाक सीमेवर जोरदार शस्त्रसंघर्ष सुरू आहे. हा विषय लिहिला जात असतानाच भारतीय लष्कराने जम्मू-काश्‍मिरातील पूंछ जिल्ह्यातील मेंधर सेक्‍टरमधील प्रत्यक्ष ताबारेषेवरून कारवाई करून सात पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातल्याची बातमी हाती आली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात प्रत्युतरादाखल केलेली ही कारवाई होती.

अलीकडे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. काही वेळा त्यांच्या हद्दीत घुसूनही कारवाया केल्या जात आहेत. या घटना पाहता जनरल रावत हे केवळ बोलघेवडे लष्करप्रमुख नाहीत याची साक्ष पटते. सीमेवर आणि काश्‍मिरात रोजच पाकिस्तानी लष्कराकडून किंवा त्यांनी पुरस्कृत केलेल्या दहशतवाद्यांकडून काहीना काही कारवाया केल्या जात असतील तर त्याला अधिक आक्रमकपणे तोंड देण्याची गरज होतीच. लष्कर प्रमुख रावत सध्या त्या मूड मध्ये दिसत आहेत. त्यांनी काश्‍मिरातील स्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी भारत सरकारकडून अधिक मोकळीक मिळावी अशी अपेक्षाही व्यक्‍त केली आहे. तेथील दहशतवाद नियंत्रणात आणता येणे शक्‍य आहे, असे नमूद करताना लष्कराला अधिक मोकळीक मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली आहे. तीही अवाजवी म्हणता येणार नाही. काश्‍मिरातील हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी लष्कराला मोकळीक देणे हाच एक पर्याय आता उरला आहे ही वस्तुस्थिती आहे. तेथील जवानांच्या सहनशीलतेचाही आता अंत होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सातत्याने दगडफेकीचा सामना करीत लष्करी जवान तेथे गस्त घालत असतात. दहशतवाद्यांच्या विरोधीतील कारवाईच्यावेळी देखील लष्करावर सर्रास दगडफेक होत असते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख स्वतःच्या विचाराने तेथे काही उपाययोजना करू पाहात असतील तर त्यांना तशी मोकळीक जरूर मिळायला हवी. विनाकारण तेथील स्थितीचा बाऊ करण्याची आता गरज नाही. लष्कराकडेही स्वत:ची स्ट्रॅटेजी असते, मैदानावरील स्थितीचा त्यांनाच नेमका अंदाज असतो. याच बळावर लष्करप्रमुखांनी जाहीरपणे काही वक्‍तव्ये करणे किंवा अपेक्षा व्यक्‍त करणे गैर ठरत नाही. लष्करप्रमुखांच्या या स्पष्टवक्‍तेपणामुळे आज पाकिस्तान बिथरला आहे. त्याचे भांडवल करून लष्करप्रमुखांवर विनाकारण तणाव निर्माण केल्याचे खापर फोडण्याचे दुष्कृत्य काही राजकीय पक्षांकडून केले जाण्याची शक्‍यता आहे.

पण राजकीय पक्षांनीही त्याविषयी संयम बाळगून लष्करप्रमुखांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. ज्या बाबींचा मैदानावर जाऊन मुकाबला करण्याची जबाबदारी शेवटी लष्करावर येते, त्या बाबतीत त्यांचे धोरण त्यांनाच ठरवू देणे ही आता काळाची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवर, जनरल रावत हे अधिक स्पष्ष्टवक्‍तेपणाने लष्कराच्या भूमिकेविषयी देशवासीयांना नेमकेपणाने माहिती देण्याचे काम करत असतील तर त्यांना गप्प करण्याची गरज नाही.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/spashtavakte+lashkarapramukh+agralekh-newsid-79951492

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

सांगलीकरांची एकतेची वज्रमूठ

सांगली : समाजात असलेले समानतेचे, एकतेचे वातावरण दूषित करणाºयांना सणसणीत चपराक देत एकीची ताकद सांगलीकरांनी रविवारी दाखवून दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थी, तरूण, तरूणी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी एक होत समानतेचा संदेश दिला. रविवार सुटीचा दिवस आणि मकरसंक्रांतीचा सण असतानाही, रविवारी सकाळी हजारो सांगलीकर एकतेचा संदेश देत रस्त्यावर उतरले होते. स्फूर्तिदायी घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी रॅलीचे वातावरण भारावून गेले होते. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झाला. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने सद्भावना एकता रॅलीची तयारी केली होती. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सकाळपासूनच सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध घटकांतील नागरिक कर्मवीर भाऊराव पाटील चौकात एकत्र आले होते. साडेनऊच्या सुमारास आशा पाटील, शारदा भोसले, रामदास कोळी, शफीक खलिफा, अभिनंदन पाटील आदी दिव्यांगांच्याहस्ते हवेत फुगे सोडून रॅलीची सुरूवात करण्यात आली. रॅलीच्या सर्वात पुढे स्केटिंग खेळाडू होते. त्यानंतर जिल्हाधिकारी विजय काळम पाटील स्वत: हातात तिरंगा ध्वज घेऊन अग्रभागी होते.
पुष्पराज चौक, पंचमुखी मारूती रोड, तरूण भारत क्रीडांगण, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जाऊन रॅलीची सांगता झाली. रॅली मार्गक्रमण करत असताना घोषणा व देशभक्तीपर गीतांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला होता. पंचमुखी मारूती रस्त्यावर ठिकठिकाणी रॅलीत सहभागी नागरिकांनी खडीसाखरेचे वाटप करण्यात येत होते. रॅलीत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय नेतेमंडळींचा सहभाग होता.
विशेष म्हणजे सर्व पक्षांतील नेत्यांचा रॅलीत सहभाग असतानाही, ते कुठेही अग्रभागी नव्हते. त्यांनी रॅलीच्या शेवटीच थांबणे पसंत केले. शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या समारोप कार्यक्रमातही स्टेजवर केवळ पोलिस व प्रशासकीय अधिकारी होते. सहभागी नेतेमंडळींची स्टेजच्या समोर बसण्याची सोय करण्यात आली होती.
स्टेजवरून पुन्हा एकदा तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडण्यात आले. रॅलीची शिवाजी क्रीडांगणावर सांगता होण्यापूर्वी तिथे केवळ विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील व पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर एकतेची शपथ देऊन व राष्टÑगीताने सांगता झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत रॅली पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनी जनतेचे आभार मानले.
प्रशासनाचे : नेटके नियोजन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अधिकाºयांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत हल्ला करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी आखला असून तो अंमलात आणण्यासाठी तीन दहशतवादी जामा मशिदीजवळ लपल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. कॉल इंटरसेप्टवर दहशतवाद्यांच्या संभाषणावरून ही माहिती समोर आली आहे. यानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत प्रमुख पाहुणे म्हणून आसियान देशांचे दहा विशेष अतिथी येणार आहेत. यामुळे त्यांच्यासमोर हिंदुस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा डाव लष्कर -ए-तोयबा व हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनांनी आखला आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. तेव्हापासून दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. याच दरम्यान कॉल इंटरसेप्टवरून काही दहशतवाद्यांच्या संभाषणातून या हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. हे संभाषण पश्तुन भाषेतील आहे.

२६ जानेवारीला दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवण्याची कामगिरी तीन अफगाणिस्तानी दहशतवाद्यांना देण्यात आली असून सध्या हे तिघे जामा मशिदीजवळ लपल्याचे संभाषणातून स्पष्ट झाले आहे. तसेच हल्ल्यासंदर्भात जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून त्यांना सूचना मिळत आहेत. दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षण दिल्याचेही या संभाषणातून समोर आल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. या संभाषणाची एक ध्वनिफीत दिल्ली पोलिसांनाही देण्यात आली आहे.

Dailyhunt

पाकिस्तानच्या कारवायांना आळा घालण्यासाठी लष्करप्रमुखांनी सुचवला नवा फॉर्म्युला

 

नवी दिल्ली - दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या काश्मीरमधील दहशवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कराचे अभियान सुरूच राहील, असे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत दिले आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र त्यासाठी राजकीय पुढाकाराबरोबरच लष्करी अभियानही सुरू राहिले पाहिजे. तसेच सीमापलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी लष्कराच्या आक्रमक कारवाईची गरज असल्याचेही लष्कर प्रमुखांनी ठणकावून सांगितले आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीबाबत काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांबाबत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताला धमक्या देण्यास सुरुवात झाली होती. मात्र रविवारी एका विशेष मुलाखतीदरम्यान, लष्करप्रमुखांनी काश्मिरमधील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराने नवी रणनीती आणि युद्धनीती विकसित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, 'पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याची धमकी म्हणजे केवळ पोकळ धमकी आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ,' असं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. रावत यांच्या या वक्तव्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असिफ ख्वाजा यांनी आज टि्वटरवरून 'भारताच्या लष्करप्रमुखांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे.
त्यांचं वक्तव्य अण्वस्त्र हल्लाला आमंत्रण देणारं आहे. आम्ही पोकळ धमकी देत नाही रावत यांची इच्छा असेल तर आमच्या अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची शंका दूर होईल, इंशाल्लाह,' अशी धमकी असिफ यांनी टि्वटरवरून दिली होती.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/pakistanachya+karavayanna+aala+ghalanyasathi+lashkarapramukhanni+suchavala+nava+phormyula-newsid-79875742

सेना दिवस 2018 के अवसर पर सेनाध्यक्ष का संदेश

सेना दिवस 2018 के अवसर पर मैं सेना के सभी अधिकारी, जूनियर कमीशंड अधिकारी, नॅान कमीशंड अधिकारी, और अन्य रैंक, सिविलियन कर्मचारी,  वीर नारी,  Veterans तथा आपके परिवार को बधाई एवं शुभकामनाएं देता हूँ। 

हम आने वाली चुनौतियों का डटकर मुकाबला करने के लिये हमेशा तैयार और सक्षम रहेंगे। हमारा प्रत्येक सैनिक सेना का गौरव और नाम कायम रखने के लिये प्रतिबद्ध है। हमारे वीर शहीदों को श्रद्धांजलि अर्पित करते हुए, उनके द्वारा कर्तव्य निभाते हुए दर्शाया गया साहस और बलिदान, हमें नए उत्साह के साथ अपने कर्तव्य निभाने के लिये प्रेरित करता रहेगा। 

   आज बीते वर्ष का आत्मविश्लेषण एवं चिन्तन करते हुए, हमें सुरक्षा की स्थिति को ध्यान में रखकर आने वाली चुनौतियों से निपटने की योजना बनानी है; 2017 में भारतीय सेना को सीमाओं पर और देश के अन्दर कई operations में सफलता प्राप्त हुई है। हमारे सैनिकों ने सीमाओं पर विरोधियों को करारा जवाब दिया है। आतंकवाद रोधी operations के दौरान मानवाधिकार के मूल्यों को कायम रखते हुए हमारा रवैया बेहद पेशेवर रहा है। प्रतिकूल और चुनौतीपूर्ण परिस्थितियों में हमारे सभी रैंक की नि:स्वार्थ कार्रवाई की वजह से जम्मू कश्मीर और उत्तर-पूर्व के सुरक्षा हालात में लगातार सुधार हो रहा है। विपदाओं के समय में हमारे सैनिकों ने तेजी से कार्रवाई करते हुए देशवासियों को हमेशा राहत पहुँचाई है और उनके बहुमूल्य जीवन को बचाने में मदद करते आए हैं। हमारा राष्ट्र अपनी सेना पर गर्व करता है, और हमें अपने उद्देश्यों को सम्मान और गौरव के साथ हासिल करने के लिये हमेशा प्रोत्साहित करता रहता है। 

        हमारा मुख्य Focus राष्ट्र निर्माण को ध्यान में रखते हुए, चुनौतीपूर्ण परिस्थितियों में प्रभावशाली operations करते रहना है। विश्व की अन्य सेनाओं के साथ भारतीय सेना के द्विपक्षीय संबंध बढ़ रहे हैं, जिसकी वजह से सैन्य कूटनीति का दायरा भी बढ़ रहा है। UN Missions में अंतर्राष्ट्रीय शांति के लिये हमारे योगदान को अंतर्राष्ट्रीय समुदाय की लगातार प्रशंसा मिलती रही है। 

   भविष्य की चुनौतियों का सामना करने के लिये हमें अपनी आधुनिक क्षमताओं को बढ़ाना होगा। हमें अपने हथियार की बेहतर क्षमताओं के लिये आधुनिक तकनीक की जरुरत है। इन का श्रेष्ठ उपयोग करने के लिए हमें प्रशिक्षण में आवश्यक सुधार करते रहना होगा। तीनों Services के सभी उपलब्ध संसाधनों का संगठित इस्तेमाल तथा आपसी तालमेल, युद्ध के मैदान पर सफलता हासिल करने की बुनियाद है, और हमको इसके लिये लगातार प्रयास करते रहना है। 

   भारतीय सेना एक ऐसी संस्था है जो राष्ट्रीय मूल्यों और संस्कारों को कायम रखने में गर्व महसूस करती है। मुझे पूरा विश्वास है कि हम अपने ऊपर स्थापित भरोसे को बनाए रखते हुए एक उभरते भारत की आकांक्षाओं को पूरा करते रहेंगे। 

   एक महान राष्ट्र के योग्य सैनिक होने के नाते, आइए हम एक बार फिर राष्ट्र सेवा के लिए स्वयं को पुन:समर्पित करें।  

             ।जय हिंद

****

कर्नल अमन आनंद

शहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार

परभणी : शहीद सदाशिव त्र्यंबकआप्पा नागठाणे यांनी वनसंरक्षण व शासनाचे हित जोपासण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने करंजगाव वन क्षेत्रातील वनवा विझविण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीद नागठाणे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार, असे प्रतिपादन वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शहीद सदाशिव नागठाणे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले की, शहीद नागठाणे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असून घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहत असतो त्यामुळे शहीद नागठाणे यांच्या पत्नी श्रीमती अर्चना सदाशिव नागठाणे यांना शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र देऊन तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा धनादेश देऊन त्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शासनाकडून मदत केली आहे. कर्तव्यदक्ष कर्मचारी शहीद झाल्याने वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/shahid+kutumbachya+pathishi+khambirapane+ubhe+rahun+shasan+sarvatopari+madat+karanar-newsid-79865346

रविवार, १४ जानेवारी, २०१८

मूलभूत विचारांकडे जाण्याची गरज - डॉ. सत्यपाल सिंह

 

पुणे - वेद, संस्कृती, परंपरा हे आपल्या देशाचे मूलभूत विचार आहेत. महासत्ता बनण्यासाठी या मूलभूत विचारांकडे जाण्याची गरज असल्याचे मत केद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी आज येथे व्यक्त केले.
विज्ञान भारती आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विश्‍व वेद विज्ञान संमेलनात डॉ. सत्यपाल सिंह बोलत होते. विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय भटकर, योगाचे अभ्यासक जेरी आर्मस्टॉंग व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. सिंह म्हणाले, इंग्रजांच्या राजवटीने आपले मन गुलाम झाले आहे. आपण पाश्‍चिमात्यांवर अधिक विश्‍वास ठेवतो. गुलामगिरीनंतर आपली मानसिकता गुलामीची झाली आहे. आपण आपले मूळच हरवून बसलो आहोत. स्वाभिमानी देश बनायचा असेल, तर आपण मूळ विचारांवर ठाम राहणे आवश्‍यक आहे.

वेद हे मानवी संस्कृतीचे मूळ आहे. त्याची तुलना कुठल्याही ग्रंथांशी करता येणार नाही. वेद अनन्यसाधारण आहेत. ते स्वप्रमाण आहेत. ती देवांची देणगी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेदांचा अभ्यास करण्याची गरज आहे. रोजच्या दैनंदिन समस्यांची उत्तरे गीतेमध्ये आढळतात. जीवन समृध्द आणि संतुलित करण्यासाठी गीतेचा अभ्यास करावा, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. भटकर यांनी आपले विचार मांडले.

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

'पानिपत'वीर सदाशिवरावभाऊंच्या समाधीचे अस्तित्व मठ रूपात

सांगली : 'पानिपत'वीरांच्या समाधींचा जीर्णोद्धार, तसेच त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. या लढाईत मारल्या गेलेल्या सदाशिवरावभाऊंची समाधी आज नाथपंथीय मठाच्या स्वरूपात आहे. पानिपत युद्धाचे स्मारक असलेल्या काला आम स्मारकस्थळी महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी पुष्पचक्र वाहिले जावे,'' अशी मागणी इतिहासाचे अभ्यासक प्रवीण भोसले यांनी केली. उद्या (ता. 14) पानिपत युद्धाचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने श्री. भोसले यांनी उत्तर भारतातील भटकंतीदरम्यान 'पानिपत'वीरांच्या घेतलेल्या समाधीच्या शोध मोहिमेची माहिती दिली.

सांगली : 'पानिपत'वीरांच्या समाधींचा जीर्णोद्धार, तसेच त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. या लढाईत मारल्या गेलेल्या सदाशिवरावभाऊंची समाधी आज नाथपंथीय मठाच्या स्वरूपात आहे. पानिपत युद्धाचे स्मारक असलेल्या काला आम स्मारकस्थळी महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी पुष्पचक्र वाहिले जावे,'' अशी मागणी इतिहासाचे अभ्यासक प्रवीण भोसले यांनी केली. उद्या (ता. 14) पानिपत युद्धाचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने श्री. भोसले यांनी उत्तर भारतातील भटकंतीदरम्यान 'पानिपत'वीरांच्या घेतलेल्या समाधीच्या शोध मोहिमेची माहिती दिली.

ते म्हणाले, ''सिंघी या रोहटक जिल्ह्यातील ठिकाणी भाऊंची समाधी आहे. सध्या नाथपंथीय मठाचे स्वरूप असलेल्या या समाधीच्या अंतर्भागात भाऊंची समाधी व शेजारी त्यांची मूर्ती स्थापन केली आहे. मठावर लिखाण करणारे स्थानिक शिक्षणाधिकारी हुडा व मठातील पूर्वापार ठेवलेल्या नोंदीनुसार हा मठ प्रत्यक्ष भाऊंनी स्थापन केला आहे. स्थानिकांचा असा विश्‍वास आहे व मठातील समाधी सदाशिवभाऊंची आहे असे ते मानतात. पानिपतावर भाऊ मारले गेले की कालांतराने, हे निश्‍चित नसले; तरी ही समाधी भाऊंची आहे, हे मठातील नोंदीनुसार स्पष्ट आहे.''

ते म्हणाले, ''मराठेशाहीच्या इतिहासात पानिपतच्या लढाईला खूप महत्त्व आहे. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पराभवाचे वर्णन 'पानिपत' असे केले जाते. खरे तर पानिपतच्या लढाईचे भारतीय इतिहासाने खऱ्या अर्थाने मूल्यमापन केले नाही. हा पराभवाचा इतिहास नव्हे, तर या देशावर चालून आलेल्या शत्रूचा एत्‌द्देशीयांनी केलेला प्रतिकार आहे. त्यामुळे ही दोन शाह्यांमधील नव्हे; तर दोन राष्ट्रांमधील लढाई होती. या लढाईला उद्या (ता. 14) 257 वर्षे पूर्ण होत आहेत. 14 जानेवारी 1761 रोजी लढाईला सुरवात झाली आणि एकाच दिवशी पुरता पराभव झाला. या इतिहासाचे स्मरण आपण करून इतिहासातून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. तत्कालीन भारतातील सर्वांत मोठे युद्ध व भीषण नरसंहार घडला, तो पानिपतच्या तिसऱ्या लढाईत. मराठे विरुद्ध अहमदशहा अब्दालीची अफगाण फौज यांच्यात झालेल्या तीव्र लढाईचा हा स्मृतिदिन. पानिपतावर मारल्या गेलेल्या मराठ्यांमध्ये सर्वच जातीधर्मांचे मराठे म्हणजे महाराष्ट्रीय होते. अठरापगड जातीजमातींच्या सैनिकांनी एकत्र येत हा लढा दिला. या सर्व जातींचे लोक या युद्धात ठार झाले. एका अर्थाने प्रातिनिधिक रूपाने महाराष्ट्रच पानिपतावर लढला. जवळपास 1,50,000 मराठे या दिवशी लढून धारातीर्थी पडले, ते हिंदुस्थानच्या रक्षणासाठीच. परकीय, अत्याचारी, लुटारूंपासून हा देश वाचविला पाहिजे, या राष्ट्रीय भावनेने मराठे इथे मातीत मिसळले. जवळपास घरटी एक लढवय्या मराठा पानिपतावर ठार झाला.''

ते म्हणाले, ''या लढाईत सेनापती सदाशिवरावभाऊ, नानासाहेब पेशव्यांचे पुत्र विश्‍वासराव ह्यांच्यासह अटकेपार भगवा फडकविणारे मानाजी पायगुडे, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे, बळवंतराव मेहंदळे, यशवंतराव पवार, खंडेराव निंबाळकर, संताजी वाघ, सखोजी जाधव, सिधोजी घाटगे, राणोजी भोई, सोनजी भापकर, इब्राहिमखान गारदी असे मराठा साम्राज्याचे प्रमुख मोहरे मारले गेले. बाजीराव-मस्तानीचे पुत्र समशेर बहादूर या युद्धातील जखमांनी भरतपूरला मारले गेले. या सर्वांच्या बलिदानाने हिंदुस्थान बचावला. देशासाठी मृत्यू पत्करण्याची तयारी तत्कालीन भारतात मराठ्यांनी सर्वप्रथम दाखविली. याची सुरवात झाली, दत्ताजी शिंदेंना दिल्लीजवळच्या बुराडी गावातील घाटावर कुतूबशहाने ज्या रीतीने मारले, त्या घटनेने. या युद्धात मरणासन्न अवस्थेतील दत्ताजींना कुतूबशहाने लाथेने डिवचून विचारले, ''क्‍यूं पटेल? और लडोगे?'' त्याही अवस्थेत दत्ताजी म्हणाले, ''क्‍यूं नही? बचेंगे तो और भी लढेंगे.'' दत्ताजींचे हे उद्‌गार भारताच्या इतिहासात अजरामर झाले आहेत. बुराडी घाटावर मारल्या गेलेल्या दत्ताजी शिंदेंची समाधी शोधण्यासाठी मी शिवपुरी, उज्जैन, ग्वाल्हेर या ठिकाणांना भेटी दिल्या. प्रत्यक्ष शिंदे घराण्यातील जाणकारांशी बोलल्यानंतर माझी खात्री झाली, की दत्ताजीरावांची समाधी अस्तित्वात नाही. यामुळे बुराडी घाट हेच त्यांचे स्मारक ठरायला हवे. त्यांचा अंत्यसंस्कार बुराडी घाटावरच झाला होता.''

सकाळ वृत्तसेवा : शनिवार, 13 जानेवारी 2018

http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-marathi-websites-panipat-war-sadashivrao-bhau-92287

 

सात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला

image

नवी दिल्ली - अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे. माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे.

हवाई दलाच्या पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘आमच्या हवाई योद्‌ध्यांनी हवाई दलाचा आणि भारताचा ध्वज उंच शिखरांवर फडकाविल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल,’ असे गौरवोद्गार धनोआ यांनी काढले. अत्यंत प्रगल्भपणे आणि संतुलित पद्धतीने आखलेल्या या व्हिन्सन मोहिमेमुळे नवा इतिहास निर्माण झाल्याचेही धनोआ म्हणाले. व्हिन्सन मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांनी केले. ‘अंटार्क्‍टिका हा खंड आमच्यासाठी नवा आणि आव्हानात्मक असला तरी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. आमचा आत्मविश्‍वास प्रबळ होता. शंभर किमी वेगाने अतिथंड वारे वाहत असताना आम्ही तीन दिवसांत शिखर सर केले,’ असे त्रिपाठी म्हणाले. इतर सहा खंडांमधील शिखरांवर तिरंगा फडकाविण्याचा मानही त्यांनी पटकाविला होता.

माउंट व्हिन्सनच्या आधी हवाई दलाने नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट, इंडोनेशियातील माउंट कार्स्टन्झ पिरॅमिड, रशियामधील माउंट एलब्रुस, दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो, अर्जेंटिनातील माउंट अकोन्काग्वा आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले ही शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत.

सात शिखरांच्या या मोहिमेदरम्यान माउंट एव्हरेस्ट चढत असताना २००५ मध्ये स्क्वाड्रन लीडर एस. एस. चैतन्य यांचा मृत्यू झाला होता. त्रिपाठी यांनी सात शिखर सर करण्याचे यश त्यांनाच समर्पित केले. हवाई दलाने एव्हरेस्ट सर केल्यानंतरच इतर खंडांमधील शिखरे सर करण्याच्या मोहिमेची आखणी झाली होती. या सर्वोच्च सात शिखरांवर तिरंगा फडकाविण्याची एकमेवाद्वितीय मोहीमच हवाई दलाने आखली होती.

यूएनआय शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना धुळ्याचे वीरपूत्र योगेश भदाणे शहीद

या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.

 

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात धुळ्याचे वीरपूत्र योगेश भदाणे शहीद झाले. ते अवघ्या २८ वर्षांचे होते. योगेश यांचा विवाह सात महिन्यांपूर्वीच झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर धुळे जिल्ह्यातील खलाने गावावर शोककळा पसरली आहे.

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

सीमा सुरक्षा दलाचा सावधगिरीचा इशारा

जम्मू: सीमा सुरक्षा दलाने जम्मू - काश्‍मीरमधील दोनशे किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांची संभाव्य घुसखोरी रोखण्याच्या हेतूने हा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना जम्मू विभागाचे सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख राम अवतार म्हणाले, "सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. हे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीमेवर शांतता राखण्यास सीमा सुरक्षा दलाचे प्राधान्य असते. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. मात्र पाकिस्तानकडून शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात.''

वृत्तसंस्था गुरुवार, 4 जानेवारी 2018