Pages

पेज

मंगळवार, २० जून, २०१७

फ्लॅटधारकांच्या हक्कांना मिळणार संरक्षण

शैलेन्द्र पाटील

03.57 AM

सातारा - बिल्डरने फ्लॅटचा ताबा ठरलेल्या तारखेला दिला नाही, ताबा देण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र दिले नाही, आराखड्याप्रमाणे बांधकाम केले नाही. चार महिन्यांत सोसायटी नोंदणीसाठी अर्ज केला नाही व त्यापासून चार महिन्यांत संपूर्ण जमीन व इमारती सोसायटीला हस्तांतरित न केल्यास दखलपात्र गुन्हा समजण्यात येतो. या फौजदारी तरतुदींविषयक अज्ञानामुळे जिल्ह्यातील बऱ्याच अपार्टमेंटमधील रहिवाशांना, स्वत:चा फ्लॅट असूनही बिल्डरच्या मेहेरबानीवर राहावे लागत आहे. पोलिस महासंचालकांच्या परिपत्रकामुळे लोकजागृती होऊ लागली आहे.

सातारा - बिल्डरने फ्लॅटचा ताबा ठरलेल्या तारखेला दिला नाही, ताबा देण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र दिले नाही, आराखड्याप्रमाणे बांधकाम केले नाही. चार महिन्यांत सोसायटी नोंदणीसाठी अर्ज केला नाही व त्यापासून चार महिन्यांत संपूर्ण जमीन व इमारती सोसायटीला हस्तांतरित न केल्यास दखलपात्र गुन्हा समजण्यात येतो. या फौजदारी तरतुदींविषयक अज्ञानामुळे जिल्ह्यातील बऱ्याच अपार्टमेंटमधील रहिवाशांना, स्वत:चा फ्लॅट असूनही बिल्डरच्या मेहेरबानीवर राहावे लागत आहे. पोलिस महासंचालकांच्या परिपत्रकामुळे लोकजागृती होऊ लागली आहे.

महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस्‌ ऍक्‍टमध्ये ग्राहकांचे हित व त्यांच्या हक्काचे संरक्षण करणाऱ्या अनेक तरतुदी आहेत. मात्र, या कायद्याचा प्रसार फारसा न करण्याची दक्षता घेतली गेली. बहुतांश ग्राहकांनीही आपले हक्क जाणून घेण्याबाबत फारसे प्रयत्न केले नाहीत. परिणामी बिल्डरकडून फसवणूक होत असूनही सदनिका खरेदी केलेले ग्राहक स्वत:चे हक्क व अधिकार जपण्यासाठी एकत्र येत नाहीत. 10-10 वर्षे वापरात असलेल्या इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. 25 वर्षांहून अधिक काळ उलटलेल्या अनेक इमारतींमध्ये अद्याप सोसायटी अस्तित्वात आलेली नाही. बिल्डर फ्लॅटचे खरेदी खत करून देत नाही, अशा अनेक ठिकाणच्या तक्रारी होताना दिसतात. इमारतीमध्ये बिल्डरनेच बेकायदेशीर बांधकाम करून मंजूर नकाशापेक्षा अधिक मजले चढविले आहेत. इमारतीच्या "ओपन स्पेस'मध्ये फ्लॅट काढण्यात आले आहेत. इमारतीचे पार्किंगच गिळंकृत करण्यात आले आहे, अशा इमारती जागोजागी पाहायला मिळत आहेत.

ओनरशिप फ्लॅटस्‌ ऍक्‍टमध्ये ग्राहकांच्या हिताची काही महत्त्वपूर्ण कलमे नमूद आहेत. त्यांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांत फिर्याद देता येते. अशा कलमांखाली दोषींविरुद्ध एक ते तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदही आहे. त्यानुसार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी या संदर्भात सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांना हा कायदा अवगत करून देऊन त्यांच्या कार्यक्षेत्रात ग्राहकांकडून अशा प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी आल्यास या कायद्याचा वापर करत कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. अनधिकृत बांधकाम करून फसवणूक करणे, ग्राहकांचा विश्‍वासघात करणे, गृहसंस्था नोंदणी करून न देणे, कन्व्हेनियन्स डीड करून न देणे या बाबीही दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आल्या आहेत.

कायदा काय सांगतो...
बिल्डरने फ्लॅटचा ताबा ठरलेल्या तारखेला दिला नाही, ताबा देण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले नाही, पालिकेचे मंजूर नकाशे बांधकामाच्या ठिकाणी प्रदर्शित केले नाहीत, फ्लॅटच्या किंमतीच्या 20 टक्के पेक्षा कमी आगाऊ रक्कम स्वीकारल्यानंतर बिल्डरने लेखी करार करून दिला नाही, करार नोंदणी कायद्याप्रमाणे नोंद करून दिला नाही, मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केले नाही, मंजुरीपेक्षा अधिक मजले चढविले, बिल्डरने चार महिन्यांत सहकारी सोसायटी (गृहसंस्था) नोंदण्यास अर्ज केला नाही, सोसायटी नोंदणीपासून चार महिन्यांत संपूर्ण जमीन व इमारती सोसायटीला हस्तांतरित केल्या नाहीत, अनधिकृत बांधकाम करून फसवणूक करणे, ग्राहकांचा विश्‍वासघात करणे, गृहसंस्था नोंदणी करून न देणे, कन्व्हेनियन्स डीड करून न देणे हा दखलपात्र गुन्हा नोंदवला जाईल.

फसवणुकीस आळा बसेल : माळवदे
दुकान गाळा, फ्लॅट खरेदी झाल्यानंतर बिल्डरने फसवणूक केल्याची बाब ग्राहकांच्या लक्षात येते. बिल्डिंमध्ये उणिवा, त्रुटी तशाच ठेवल्या जातात. या विरोधात ग्राहक पोलिसांत गेल्यास बऱ्याचवेळा दबावापोटी "एफआयआर' घेतली जात नव्हती. पोलिस महासंचालकांच्या परिपत्रकामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागेल. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी आपल्या हक्‍कांच्या संरक्षणार्थ पोलिसांत गुन्हा नोंदवावा, असे आवाहन पालिकेचे माजी उपाध्यक्ष शंकर माळवदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

टॅग्स

रविवार, १८ जून, २०१७

सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची यशस्वी सांगता

पणजी – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असणारे हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्या कार्याला गती आणि दिशा मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला.

या अधिवेशनात अन्य प्रस्तावांसह भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला. या अधिवेशनाला भारतातील 22 राज्यांसह श्रीलंका आणि बांगलादेश येथील 132 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 342 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तेलंगण येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेनेचे संस्थापक टी. राजासिंह, भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महासचिव अनिल धीर, बेंगळुरु उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे उपाध्यक्ष अमृतेश एन.पी. आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे उपस्थित होते.

यावेळी डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, “शासकीय, वाणिज्य, शैक्षणिक आणि राजकीय या क्षेत्रांत उफाळून आलेल्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात संघटितपणे लढा देण्याचे अधिवेशनात ठरले. याद्वारे खऱ्या अर्थाने निकोप समाजव्यवस्था निर्माण होऊन त्या माध्यमातूनच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्‍य असल्याचा विचार हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधींच्या मनात दृढ झाला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन राष्ट्र आणि धर्मरक्षण यांसाठी वर्षभर कार्य करण्याचेही ठरवले.

यावेळी आमदार श्री. टी. राजासिंह म्हणाले, “गोमातेची हत्या रोखण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्तरावर एक धोरण ठरवावे. गेली 6 वर्षे मी सनातन संस्थेचे कार्य जवळून पहात आहे. संस्था करत असलेले कार्य कौतुकास्पद असून सनातन संस्था ही गोव्यासाठी भूषणावह आहे. परिषदेला संबोधित करतांना अधिवक्ता अमृतेश एन्‌.पी. म्हणाले, आजपासून अधिवक्‍त्यांच्या दोन दिवसीय शिबीराला आरंभ होत आहे. या शिबीरात विविध राज्यांतून 50 हून अधिक अधिवक्ते सहभागी होणार आहेत. हिंदूहितासाठी लढणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना कायदेविषयक साहाय्य कसे देता येईल, यासाठीचे धोरण या शिबिरात निश्‍चित करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व खात्याकडून हिंदूंच्या प्राचीन वास्तूंच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या विषयावर अधिवेशनात चर्चा झाली.

मानवी हक्क लष्कराने नेहमीच जपले : रावत

हैदराबाद : मानवीहक्क लष्कराने नेहमीच चांगले जपले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी शनिवारी येथे म्हटले. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावाला तोंड देताना जीपला माणसाला बांधले गेले होते ती घटना विशिष्ट परिस्थितीत घडली होती. दगडफेकीच्या घटनांना तोंड देण्यास त्याच पद्धतीचा वापर वारंवार होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात तरूण पिढीने सुरक्षा दलांच्याविरोधात हाती शस्त्रे घ्यावीत यासाठी लोकांमध्ये चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी माहिती पसरवली जाते. दगडफेक करणाऱ्यांना तोंड देण्यासाठी जीपला एका व्यक्तिला बांधणारे मेजर लितुल गोगोई यांच्याबद्दल बोलताना रावत म्हणाले,''निर्माण झालेल्या परिस्थितीत आम्ही करीत असलेले काम व कृती ही जबाबदारीचे स्वरुप विचारात घेऊन असते.'' परंतु आम्हाला मानवी हक्कांची काळजी असते व मानवीहक्कांचे उल्लंघन होणार नाही एवढी काळजी आम्ही घेतो, असे रावत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. दुंडीगल येथील हवाई दल अकादमीत भारतीय हवाई दलाच्या फ्लाईट कॅडेट्सनी प्रि कमीशनिंग पूर्ण केल्याच्या तसेच पदवी प्रदानाच्या संयुक्त कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मानवीहक्कांवर लष्कराचा प्रचंड विश्वास असून मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची लष्कराची चांगली ख्यातीही आहे, असे ते म्हणाले.

Dailyhunt

काश्मिरात तणाव

अवंतीपूरा : काश्मीरच्या अनेक भागांत शनिवारी अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या हालचालींवर बंधने घातली. सुरक्षा दलांच्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लादले. हे निर्बंध श्रीनगर, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांत आहेत.

जम्मू आणि काश्मीरचे पोलिस अधिकारी फेरोज अहमद दार (३२) यांचा शुक्रवारी रात्री त्यांच्या डोगरीपोरा (जि. पुलवामा) येथील पिढीजात कब्रस्तानात दफनविधी झाला. यावेळी अनेक ग्रामस्था आणि पोलिस खात्यातील सहकारी उपस्थित होते.

अचबल (जि. अनंतनाग) येथे लष्कर ए तयबाच्या संशयित दहशतवाद्यांनी पोलिस पथकावर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात दार व इतर पाच पोलिस ठार झाले होते. हल्लेखोरांनी या पोलिसांचे चेहरे विद्रूप करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याकडील शस्त्रेही ते घेऊन गेले. फेरोज दार यांच्या मागे वृद्ध आईवडील, पत्नी व सहा व दोन वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. दार हे धाडसी अधिकारी असल्यामुळे मित्रमंडळीत ते दबंग नावाने परिचित होते.

काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी तीन वेगवेगळ्या घटनांत १४ जण ठार झाले. मृतांत तीन दहशतवादी, दोन नागरिक, जवान आणि आठ पोलिसांचा समावेश आहे.

दक्षिण काश्मीरच्या अरवानी (जि. किलगाम) खेड्यात सुरक्षा दलांनी मलिक मोहल्ला भागातील एक घरात लष्कर ए तयबाच्या दहशतवाद्यांना घेरले. येथे झालेल्या जोरदार गोळीबारात जुनेद मट्टू याच्यासह तीन दहशतवादी मारले गेले. खोऱ्यात १२ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांत मट्टूचा समावेश होता. सुरक्षा दलांनी त्या घराला वेढा घालताच त्या भागात युवक जमले व त्यांनी सुरक्षादलांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे सुरक्षा दले आणि नागरिकांत चकमक सुरू झाली.या गोळीबारात मोहम्मद अश्रफ खार (२२) आणि अहसान दार (१४) हे नागरिक ठार झाले.

तीन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले

लष्कर ए तयबाचा कुख्यात दहशतवादी जुनेद अहमद मट्टू उर्फ जाना (२४), अदिल मुश्ताक मिर उर्फ नाना (१८) आणि निसार अहमद वानी (२०) यांचे मृतदेह दक्षिण काश्मीरमधील अरवानी खेड्यात चकमकीच्या ठिकाणी आढळले. गेल्या जूनमध्ये जुनेद याने भरदिवसा अनंतनाग बसस्थानकावर दोन पोलिसांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर लष्कर ए तयबात त्याला दक्षिण काश्मीरचा कमांडर बनवण्यात आले होते.

निक्रिय सरकारमुळेच जवानांचा बळी जातोय! शहीद बख्तवार सिंगच्या वडिलांचा संताप

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा सपाटाच पाकिस्तानने लावला आहे. ‘आळशी’ आणि निक्रिय केंद्र सरकारमुळेच हे घडत असून त्यात हिंदुस्थानी जवानांचा रोज बळी जात आहे, अशा शब्दांत गुरुवारी शहीद झालेल्या नाईक बख्तवार सिंग या जवानाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.

नौशेरा येथे पाकड्य़ांच्या हल्ल्यात बख्तवार सिंग शहीद झाला. डबडबत्या डोळ्यांनी वीरपत्नी जसबीर कौर यांनी पती शहीद बख्तवार सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि सॅल्यूट केले. माझे पती देशासाठी शहीद झाले याचा मला गर्व आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला माझा मुलगा घेईल. मुलगाही लष्करामध्ये भरती होईल असे त्यांनी सांगितले.

जुनैदला दफन; दहशतवाद्यांचा गोळीबार
दहशतवादी जुनैद मट्टू याला आज कुलगाम जिल्हय़ात दफन करण्यात आले. जुनैदच्या जनाजावेळी दहशतवाद्यांनी मातम करीत हवेत गोळीबार केला. यावेळी मोठय़ा संख्येने आजूबाजूच्या गावातील नागरिक जनाजासाठी आले होते.