भारतीय नौदलाचे आकाशातील नेत्र असलेल्या TU-142M विमानाला निरोप देण्यात आला. TU-142M विमानाने 29 वर्ष नौदलात सेवा बजावली. तामिळनाडूच्या आराकोनम येथील आयएनएस राजालीतळावर पार पडलेल्या या निरोप संमारंभला नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा, व्हाईस अॅडमिरल एचसीएस बिस्ट आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. टेहळणी आणि पाणबुडी विरोधी मोहिमांमध्ये TU-142M विमानाचा वापर करण्यात आला. मालदीवच्या कॅक्टस ऑपरेशनमध्ये TU-142M विमानाने महत्वाची भूमिका पार पाडल्याची आठवण सुनील लांबा यांनी सांगितली. 1999 साली प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये सहभागी झालेले टीयू नौदलाचे पहिले विमान होते.
Pages
पेज
रविवार, २ एप्रिल, २०१७
Health Tips - ताक पिण्याचे हे आहेत 12 फायदे
मुंबई, दि. 31 - एप्रिल सुरु होण्यापूर्वी उन्हाचा वाढता तडाखा, उष्माघाताचा धोका, स्वाईन फ्लूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल लक्षात घेता उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मार्च ते जून या कालावधीत थकवा येणे, ताप येणे, डोके-पोट दुखणे, भूक न लागणे, मानसिक अस्वस्थता अशा अनेक समस्या उद्भवतात.
उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या काळात वातावरणातील उष्णता एरवीपेक्षा जास्त असते.
बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा त्रास किंवा डिहायड्रेशन तसेच इतर समस्या टाळण्यासाठी ताक पिणे हा उत्तम पर्याय आहे. बाजारातील विकतची सॉफ्टड्रिंक्स प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच ताक पिणे फायदेशीर आहे..
ताक पिण्याचे हे आहेत 12 फायदे
- इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचा मुबलक साठा असल्याने ताकामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- मसालेदार पदार्थांचा त्रास रोखण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. तसेच पोटामधील मसाल्यामुळे होणारी जळजळ कमी करते.
-शरीरात वाढलेले कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते.
- उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच अॅसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काळी मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने अॅसिडिटी बरी होते.
- ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या होत नाहीत. अधिक जेवण झाल्यास ताक पिल्याने मोठा फायदा होतो.
- ताकामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.
- ताकामध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई, के आणि बी असते. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होते.
- वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
- दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
- ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
- थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
- रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
अॅमेझॉनच्या चुकीला माफी नाही

नवी दिल्ली - अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर जानेवारी महिन्यात भारतीय राष्ट्रध्वजाच्या पायपुसण्या आणि चप्पला विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतातील वातावरण चांगलेच तापले होते, त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला चांगलेच फैलावर धरले होते. अशा उत्पादनांची विक्री जर लगेच थांबवली नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल अशी धमकी स्वराज यांनी दिली होती, अॅमेझॉनने त्यानंतर लगेच माफी मागत ही सारी उत्पादने आपल्या साईट्सवरून हटवली होती. पण अॅमेझॉनच्या माफीवरच हे प्रकरण थांबले नाही आता अॅमेझॉनवर कारवाई करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.
याबाबत वृत्तसंस्थेला मिळालेल्या महितीनुसार अमेरिका आणि कॅनडाच्या दूतावासात भारताने काही दस्ताऐवज पाठवली आहे.
अॅमेझॉनच्या वरिष्ठांसमोर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी हा मुद्दा उपस्थित करा अशी मागणी या दस्ताऐवजात केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अमेझॉनच्या वरिष्ठापुढे तितक्याच ताकदीने हा मुद्दा उपस्थित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ माफी मागून हे प्रकरण निवळणार नाही, हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तसेच भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे कोणतेही उत्पादन अॅमेझॉनच्या कोणत्याही संकेतस्थळावर यापुढे दिसणार नाही अशी हमी देखील भारताने मागितली असल्याचे समजत आहे.
वाहन परवाना आणि नोंदणी आधार क्रमांकाशी जोडणार
मोटर वाहन कायद्यातील दुरूस्तींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मोटर वाहन कायद्याशी निगडीत दुरूस्ती विधेयकाला मंजुरी दिली. त्यानुसार वाहन परवाना आणि वाहनांची नोंदणी आधार क्रमांकाशी जोडण्यात येईल. या विधेयकात वाहतूक नियमांच्या भंगाबद्दल मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
परिवहन आणि रस्ते क्षेत्रांमधील सुधारणांच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे मोटर वाहन दुरूस्ती विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकातील दुरूस्तीनुसार वाहन परवान्याचा अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक गरजेचा ठरेल. याशिवाय, शिकाऊ वाहन परवाना ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याने जनतेला तो मिळवण्यासाठी परिवहन कार्यालयात जावे लागणार नाही.
आधारशी निगडीत पडताळणीमुळे बनावट परवान्यांना आळा बसेल. वाहनांसाठी आणि परवान्यांसाठी रजिस्टर बनवले जाणार आहे. ते संपूर्ण देशात उपलब्ध होईल. या इलेक्ट्रॉनिक रजिस्टरच्या माध्यमातून वाहनांची नोंदणी करण्याचे आणि क्रमांक जारी करण्याचे अधिकार वाहन वितरकांना दिले जातील.
याशिवाय, खराब रस्त्यांबद्दल संबंधित कंत्राटदारांना दंड ठोठावण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे.
शनिवार, १ एप्रिल, २०१७
ऑनलाईन रेल्वे तिकीटावर ३० जूनपर्यंत लागणार नाही सर्विस टॅक्स
मुंबई : रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक केल्यास ३० जूनपर्यंत कोणताही सर्विस टॅक्स लागणार नाही. सरकारने डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी यासाठी ऑनलाईन ट्रेन बुकींगला सर्विस टॅक्समधून सूट दिली आहे. नोटाबंदीनंतर २३ नोव्हेंबर २०१६ पासून ३१ मार्च २०१७ पर्यंत ऑनलाईन तिकीट बुकींगच्या सर्विस टॅक्समध्ये सूट देण्यात आली होती. आता ही सूट ३० जून २०१७ पर्यंत असणार आहे. ऑनलाईन तिकीट बूक केल्यास २० ते ४० रूपये सर्विस टॅक्ससाठी द्यावे लागत होते. मात्र, आता ३० जूनपर्यंत सर्विस टॅक्समधून प्रवाशांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना बराच दिलासा मिळाला आहे.
भारताच्या अण्वस्त्र प्लस हिंदुत्वामुळे बिथरला पाकिस्तान
इस्लामाबाद, दि. 1 - अणवस्त्राचा पहिला वापर न करण्याच्या आपल्या धोरणावर फेरविचार करण्याचे भारताने संकेत देताच पाकिस्तानी राज्यकर्ते टेंन्शनमध्ये आले आहेत. हिंदुत्वाचा अजेंडा असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने पाकिस्तान जास्त चिंतित असल्याचे डॉन दैनिकाने निवृत्त पाकिस्तानी जनरलच्या हवाल्याने म्हटले आहे. भारताकडून देण्यात आलेले संकेत हा डिवचण्याचा, चिथावणीचा भाग असल्याचे एहसान उल हक या निवृत्त जनरलने सांगितले. ते अजूनही पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाशी संबंधित आहेत.
मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भारतीय वंशाचे तज्ञ विपिन नारंग यांनी वॉशिंग्टनमध्ये एका सेमिनारमध्ये बोलताना भारताच्या अणवस्त्र वापरा संबंधीच्या धोरणात बदल झाल्याचे म्हटले होते.
पहिला अणवस्त्राचा वापर न करण्याच्या आपल्या मूळ धोरणापासून भारत दूर गेला आहे. पाकिस्तान अणवस्त्र हल्ला करु शकतो असे भारताला वाटले तर, भारत पाकिस्तानला संधी न देता अणवस्त्रांचा वापर करेल असे त्यांनी म्हटले होते.
भारताचा हा हल्ला पारंपारिक पद्धतीचा नसेल असे नारंग यांनी म्हटले होते. अणवस्त्राचा पहिला वापर न करण्याच्या भारताच्या धोरणाबद्दल सुरुवातीपासूनच आम्हाला संशय आहे असे एहसान उल हक यांनी सांगितले. भारत असे संकेत देऊन एकप्रकारे पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेला आव्हान देत आहे असे हक यांनी सांगितले. 'लर्निंग टू लाईव्ह विथ द बॉम्ब, पाकिस्तान 1998-2016' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना हक यांनी भारताच्या अणवस्त्र धोरणाबद्दल ही विधान केली.
ऑनलाइन लोकमत
ऑनलाईन' करातून 80 कोटींचा टप्पा ओलांडला
मिळकत कर : पुढील वर्षापासून मिळणार सवलत
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) - महापालिकेच्या तिजोरीत "ऑनलाईन'व्दारे सुमारे 80 कोटी 36 लाख रुपयांचा कर शुक्रवारी सायंकाळपर्यंत जमा झाला आहे. त्यामुळे अजुनही करात निश्चित वाढ होणार आहे. गतवर्षी हे प्रमाण 80 कोटी 55 लाख होते. मात्र, पुढील आर्थिक वर्षात "ऑनलाईन' कर भरणाऱ्या नागरिकांना करात 2 टक्के सूट दिली जाणार आहे, अशी माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2009-10 या आर्थिक वर्षापासून "ऑनलाईन' कर भरण्यास सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या आर्थिक वर्षात 3 हजार 835 कर धारकांनी 2 कोटी 11 लाख रुपयांचा कर भरला होता.
त्यानंतर 2010-11 मध्ये 9 हजार 338 कर धरकांनी 7 कोटी 29 लाखांचा कर भरला, 2011-12 मध्ये "ऑनलाईन' करसंकलन 13 कोटी 62 लाखांवर गेले. यावर्षी 15 हजार 783 नागरिकांनी "ऑनलाईन' पद्धतीने कर भरला होता. तर 2012-13 या आर्थिक वर्षात "ऑनलाईन'पद्धतीने कर भरणाऱ्यांची संख्या वाढून ती 28 हजार 966 वर पोहोचली. त्यावर्षी 26 कोटी 96 लाख रुपयांचा कर "ऑनलाईन' पद्धतीने भरला होता.
2013-14 या वर्षात 47 हजार 529 कर धारकांनी 46 कोटी 97 लाख रुपये "ऑनलाईन' पद्धतीने भरले गेले. तर 2014-15 मध्ये 61 हजार 913 कर धारकांनी 64 कोटी 68 लाखांचा कर भरला. तसेच, 2015-16 यामध्ये 76 हजार 390 कर धारकांनी 80 कोटी 55 लाखांचा कर "ऑनलाईन' पद्धतीने कर भरला. 2016-17 यामध्ये एकूण 84 हजार 271 कर धारकांनी 22 टक्के कर वसुली झाली असून, 80 कोटी 36 लाख रुपये रक्कम "ऑनलाईन' पद्धतीने भरली आहे.
त्यामुळे "ऑनलाईन' कर भरण्यासाठी नागरिकांनी जास्तीत-जास्त पुढाकार घ्यावा, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.
तरच महिला निर्भीड होतील : विश्वास नांगरे पाटील
नागरीक व पोलीस परिसंवाद
तळेगाव दाभाडे, दि. 1 (वार्ताहर) - मुलींनी सोशल मीडियाचा वापर अतिशय सावधानतेने करावा. महिला व मुलींनी निर्भीड होऊन छेडछाड करणाऱ्यांना धडा शिकवावा. तुमच्या मदतीसाठी तुमचा "पोलीस दादा' सोबत आहे. शांत सुरक्षित कामशेत परिसरासाठी नागरिकांनीच साध्या वेशातील पोलीस व्हावे. पोलीस ठाणे महिलांना माहेरघर वाटावे, पोलीस त्यांचा दादा झाला, तरच महिला निर्भीड होतील, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
कामशेत येथे शुक्रवारी (दि. 31) नागरीक व पोलीस परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश शिवथरे, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब खेडेकर, मधुकर काकडे, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
नांगरे पाटील म्हणाले, मावळ तालुक्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी, दरोडे, गंभीर गुन्ह्यातील इसमांवर करडी नजर असून परिसरात दारू, मटका, जुगार, अवैध धंदे असल्यास पोलिसांत तक्रार करा. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
जमिनीच्या व्यवहारात पोलिसांनी अडकू नये; पोलीस व नागरिकांमध्ये संवाद वाढला पाहिजे.
नागरीक व पोलीस परिसंवादाच्या माध्यमातून नागरीक, महिला व विद्यार्थीनींचे प्रश्न जाणून घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थीनीने स्वागत गीत सादर केले. यानंतर नांगरे पाटील यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून महिला व मुलींना कोणी त्रास देत आहे का? या प्रश्नाने सुरुवात केली. अनेक विद्यालयीन विद्यार्थीनींनी प्रश्न विचारले.
कामशेत शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत व पोलीस यांची मिटिंग बोलावून शहरातील वाढलेली अतिक्रमणे एक महिन्याच्या आत काढण्यासाठी, तसेच वाहतूक कोंडी सोडवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. जुना मुंबई-पुणे महामार्गावर व द्रूतगती मार्गावर ठराविक ठिकाणी होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजनांवर नागरिकांनी प्रश्न मांडले.
सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांना पोलिसांचा त्रास होत असल्याची एका व्यापाऱ्याने तक्रार करून चोरीचा माल तुम्ही विकत घेतला का? असा प्रश्न विचारून पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले जाते. यामुळे आमच्या व्यवसायावर निष्कारण परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तरुणांनीही उपस्थित राहून प्रश्न विचारले. शहरातील शाळांच्या परिसरात शाळा सुटणे व भरण्याच्या वेळी अनेक दुचाकीस्वार शाळेच्या भोवती घिरट्या घालतात. बुलेट गाडीच्या सायलेन्सरमधून फाटक्यासारखे आवाज काढले जातात, अशा तक्रारी केल्या. त्यांच्यावर लवकरच कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांना दिले.
कामशेतच्या सरपंच सारिका शिंदे, सदस्या सारिका घोलप, रुपाली शिनगारे, पोलीस पाटील सविता वरघडे, पुणे जिल्हा महिला दक्षता समिती सदस्या कल्पना कांबळे, लायन क्लब महेश शेट्टी, सुनील भटेवरा, पंडित नेहरू विद्यालयाचे प्राचार्य एस. डी. घुले, खांडशीचे सरपंच बाळासाहेब शिरसट, ताजेचे सरपंच रामदास केदारी, व्ही. आय. टीचे निलेश गारगोटे, कैलास गायकवाड, तुकाराम शेंडगे, चंद्रकांत राऊत, महादू लगड, विठ्ठल शेंडगे, डॉ. विकेश मुथा, गणेश भोकरे, माजी सरपंच विजय शिंदे तसेच नाणे व पवन मावळातील नागरीक, पोलीस दक्षता कमिटी सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व नागरीक उपस्थित होते
चीननं हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये - रिजिजू
गुवाहाटी : तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा सध्या हिंदुस्थानमधील अरुणाचलच्या यात्रेवर आहेत. दलाई लामांच्या यात्रेवर आक्षेप घेत चीननं हिंदुस्थानला धमकावत दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम होईल असं म्हटलं होतं. चीनच्या या वक्तव्यवर गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चीनला जशास-तसे उत्तर दिलं आहे. ‘चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हिंदुस्थान हस्तक्षेप करत नाही, चीननंही हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये’ अशा कडक शब्दात रिजिजू यांनी चीनला खडसावलं आहे.
चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते ला कंग यांनी दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या यात्रेवर चिंता व्यक्त केली होती.
तसंच दलाई लामांच्या यात्रेमुळे चीनला चिंता वाटत असल्याचंही कंग यांनी म्हटलं होतं. मात्र चीनचा विरोध झुगारत दलाई लामा १३ दिवसांच्या ईशान्य हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चिडलेल्या चीननं हिंदुस्थानला धमकावलं होतं. मात्र गृहराज्यमंत्र्यांनी चीनला हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
सामना
काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 2 जवान जखमी
श्रीनगर - पारीमपोरा-पंथाचौक बायपास रोडवर शनिवारी दुपारी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले. सव्वा एकच्या सुमारास एसकेआयएमएस रुग्णालयाजवळून जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर लगेचच काही समाजकंटकांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बेमिया येथील स्कीम्स हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.
ताफ्यातील शेवटच्या गाडीतील दोन जवान जखमी झाले. पारीमपोरा येथून पंथाचौकच्या दिशेने ताफा चाललेला असताना हा हल्ला झाला. गोळीबाराला प्रत्युत्तर मिळताच दहशतवादी तिथून पसार झाले अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरु झाली आहे.
SBI खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर, भरा दंड
नवी दिल्ली, दि. 1 - आजपासून सुरु झालेल्या नव्या आर्थिकवर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवे नियम लागू केले आहेत. यापुढे स्टेट बँकेच्या खातेधारकांना अकाऊंटमध्ये नियमानुसार किमान (मिनिमम) बॅलन्स ठेवावाच लागेल. महानगर क्षेत्रातील ग्राहकांन कमीत कमी 5 हजार, शहरी भागातील ग्राहकांना 3 हजार आणि निम शहरी भागातील ग्राहकांना 2 हजार आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना 1 हजार रुपये खात्यात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर, दंड आकारला जाईल तसेच एका महिन्यात तीन वेळा खात्यातून रोकड रक्कमेचा व्यवहार केला तर, बँकेकडून 50 रुपये दंड आकारला जाईल.
31 कोटी खातेधारकांना या जाचक नियमांचा फटका बसणार असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
3 मार्चला बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या नोटीसनुसार खात्यात नियमानुसार बॅलन्सची रक्कम नसेल तर, जेवढी रक्कम आहे ती आणि आवश्यक बॅलन्स यामध्ये जी तफावत असेल त्यानुसार दंड आकारला जाईल.








